उत्तरप्रदेशात महापुरुषांची जयंती आणि महाशिवरात्री यांदिवशी पशुवधगृहे अन् मांसविक्री यांवर बंदी
देशातील सर्वच राज्यांत असा नियम केला पाहिजे ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – महापुरुषांची जयंती आणि महाशिवरात्री यांदिवशी राज्यात पशुवधगृहे अन् मांसविक्री यांवर बंदी घालण्यात आली आहे. यादिवशी मांसविक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या आदेशात म्हटले आहे की, महावीर जयंती, बुद्ध जयंती, गांधी जयंती, महाशिवरात्री आणि सिंधी समाजातील संत टी.एल्. वासवानी यांच्या जयंतीच्या दिवशी शहरी भागांत असलेल्या पशुवधगृहांच्या व्यतिरिक्त मांसाची दुकाने बंद ठेवावीत. अहिंसेचा संदेश देणार्या महापुरुषांची जयंती ‘अहिंसा दिन’ म्हणून साजरी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
योगी सरकार ने आदेश जारी कर महावीर जयंती, बुद्ध जयंती, गांधी जयंती, शिवरात्रि और साधु टीएल वासवानी की जयंती के मौके पर नगरीय निकायों में स्थित बूचड़खानों के अलावा मीट की दुकानें बंद रखी जाएंगी.https://t.co/sMnDsGfo6T
— News Nation (@NewsNationTV) November 25, 2021