देशाच्या लोकसंख्येत प्रथमच १ सहस्र पुरुषांमागे १ सहस्र २० महिला !
नवी देहली – भारतात प्रथमच एकूण लोकसंख्येत प्रति १ सहस्र पुरुषांमागे महिलांचे प्रमाण १ सहस्र २० इतके झाले आहे. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-५’च्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष २०१५-१६ मधील सर्वेक्षणामध्ये हे प्रमाण १ सहस्र पुरुषांमागे ९९१ महिला, असे होते. गावांत प्रति १ सहस्र पुरुषांमागे १ सहस्र ३७ महिला आहेत. शहरांत मात्र हे प्रमाण ९८५ इतकेच आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये स्वत:चे आधुनिक शौचालय असलेली घरे ४८.५ टक्के होती. वर्ष २०१९-२१ मध्ये ही संख्या ७०.२ टक्के झाली. देशातील ९६.८ टक्के घरांपर्यंत वीज पोचलेली आहे.
Good News: देश में पहली बार पुरुषों से ज्यादा महिलाएं, गांव में बढ़ा सेक्स रेशियो https://t.co/1SFq5itYjI
— India TV Hindi (@IndiaTVHindi) November 25, 2021