अॅमेझॉनवर कठोर कारवाई करा ! – ‘कॅट’ची मागणी
|
|
नवी देहली – अमेरिकेतील बलाढ्य आस्थापन ‘अमेझॉन’वरून गांजा आणि बाँब बनवण्याची साधनसामग्री, देशात बंदी घातलेली काही रसायने ग्राहकांना सहज उपलब्ध होत असल्याचे समोर आल्यामुळे या आस्थापनावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यातच आता देशातील ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) या आस्थापनाच्या विरोधात २४ नोव्हेंबर या दिवशी देशातील वेगवेगळ्या राज्यांत ५०० हून अधिक जिल्ह्यांत १ सहस्र २०० हून अधिक ठिकाणी धरणे आंदोलन केले. ‘अमेझॉन’ने देशातील कायदे आणि नियमांनुसार व्यवसाय करावा अथवा भारतातून निघून जावे’, अशी चेतावणी ‘कॅट’ने दिली. ‘देशात सामान्यांसाठी आणि मोठ्या आस्थापनांसाठी वेगवेगळे कायदे आहेत का ?’ असा प्रश्नही या संघटनेने विचारला. ‘या प्रकरणात ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर देशातील व्यापारी ‘भारत व्यापार बंद’ करतील’, अशीही चेतावणी त्यांनी दिली.
CAIT demands action against Amazon for ‘marijuana sale’ https://t.co/ETTtxce1iS @deccanherald @praveendel @BCBHARTIA @sumitagarwal_IN @narendramodi @PMOIndia @rajnathsingh @AmitShah @PiyushGoyal @nsitharaman @HardeepSPuri @smritiirani @ChouhanShivraj @drnarottammisra @CimGOI
— Confederation of All India Traders (CAIT) (@CAITIndia) November 23, 2021