पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिकच्या वापरावर मर्यादा येणार !
प्लास्टिकच्या वापरावर मर्यादा घालण्यापेक्षा पुनर्वापर न होणार्या प्लास्टिकचे उत्पादनच बंद केल्यास समूळ कारणच नष्ट होईल. – संपादक
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – प्लास्टिक हे अविघटनशील असल्याने २३ मार्च २०१८ या दिवशी काढलेल्या अधिसूचनेअन्वये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यालय, सर्व क्षेत्रीय कार्यालये, कर संकलन विभागीय कार्यालये, शाळा, चिकित्सालये आणि रुग्णालये तसेच महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये पुनर्वापर न होणार्या प्लास्टिक वापरासंदर्भात निर्बंध लादले असून त्यांची कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. पुनर्वापर न होणारे प्लास्टिक वापरले जाणार नाही, याचे दायित्व विभाग प्रमुखांचे असेल. विभागांमध्ये कोठेही प्लास्टिक वापरल्याचे आढळल्यास विभाग प्रमुखांवर दंडात्मक कारवाई होईल, अशी चेतावणीही आदेशामध्ये दिली आहे.