पाकमध्ये मंदिर तोडणार्यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !
|
|
करक (पाकिस्तान) – येथे डिसेंबर २०२० मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. नंतर न्यायालयाने हे आक्रमण करणार्यांपैकी ११ मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) दंड ठोठावला होता.
Pakistan: Hindu Council pressurised to pay fines of remaining accused of the Karak temple attackhttps://t.co/KqxOvDTkFx
— OpIndia.com (@OpIndia_com) November 24, 2021
मौलवींनी आणलेल्या दबावानंतर हा दंड येथील हिंदु कौन्सिललाच भरावा लागला, असे वृत्त समोर आले आहे. यामुळे या प्रकरणातील अन्य १२३ आरोपींनीही त्यांना करण्यात आलेला दंडही हिंदु कौन्सिलनेच भरावा, अशी मागणी केली आहे; मात्र कौन्सिलने यास नकार दिला आहे. हिंदु कौन्सिलने प्रत्येक मौलवीवरील २ लाख ६८ सहस्र रुपयांचा दंड भरला आहे.
पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींकडून ३ कोटी ३० लाख रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर यांतील १० मौलवी या मंदिराचे पुनर्निमाण करण्यास विरोध करू लागले होते. स्थानिक प्रशासनही हिंदूंना साहाय्य करत नव्हते. त्यामुळेच हिंदु कौन्सिलने त्यांचा दंड भरला.