(म्हणे) ‘हा प्रयत्न भारतातील इस्लामविषयीच्या द्वेषाला आणखी हवा देईल !’
|
पाकच्या राष्ट्रपतींचा कांगावा ! भारतात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक असतात, हे नेहमीच समोर येत असते. भारतात गेली ३ दशके चालू असलेला आतंकवाद हा इस्लामी आतंकवाद आहे, हे जगजाहीर आहे. अशा आतंकवाद्यांची नावे जी असणार, तीच चित्रपटात दाखवण्यात आल्यावर पाकच्या राष्ट्रपतींना का त्रास होतो ? – संपादक
मुंबई – नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट ‘सूर्यवंशी’मध्ये खलनायकाचे मुसलमानी नाव असल्यावरून काही लोकांकडून विचारणा करण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात यांनीही याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकचे राष्ट्रपती आरिफ यांनी म्हटले की, हा प्रयत्न भारतातील ‘इस्लामोफोबिया’ला (इस्लामविषयीच्या द्वेषाला) आणखी हवा देईल. मला आशा आहे की, भारतीय जनता अशा प्रकारच्या गोष्टी योग्य रितीने हाताळील.’ चित्रपटाची कथा ही पाकिस्तानातून भारतात येणार्या आतंकवाद्यांवर आधारित आहे.
Pakistan president Arif Alvi reaction on Suryavanshi: पकिस्तान ने किया सूर्यवंशी फिल्म से इस्लामोफोबिया को बढ़ावा देने का दावाhttps://t.co/FxgbqtJpqu
— InKhabar (@Inkhabar) November 18, 2021
पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘सूर्यवंशी’ चित्रपट ‘इस्लामोफोबिया’ वाढवत आहे. हा प्रकार हॉलीवूडमधून चालू झाला होता. जर आपण चित्रपटात मुसलमान व्यक्तीरेखेला सकारात्मक दाखवू शकत नाही, तर निदान तिच्यासमवेत न्याय तरी करू शकतो.
हिंदु खलनायक दाखवल्यावर प्रश्न का उपस्थित होत नाहीत ? – दिग्दर्शक रोहित शेट्टी
यापूर्वी मुसलमानाला खलनायक दाखवण्यावरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी म्हटले होते की, जर माझ्या चित्रपटाचा खलनायक हिंदू असता, तर हे प्रश्न विचारले गेले असते का ? माझ्या ३ चित्रपटांमध्ये हिंदू खलनायक होते, तेव्हा कुणी असे प्रश्न विचारले नाहीत. जर आतंकवादी हे पाकिस्तानमधून भारतात येत असतील, तर त्यांची नावे चित्रपटात आपण काय ठेवू ? त्यांचा धर्म कोणता असतो ? चित्रपटाची कथाच यावर आधारित आहे की, पाकिस्तानातून आतंकवादी येतात आणि त्यांना भारतीय पोलीस अधिकारी पकडतात.