वजनमाप खात्यातील नोकरभरती घोटाळ्याच्या प्रकरणी मंत्र्यांना पदावरून निलंबित करा ! – गिरीश चोडणकर, काँग्रेस
|
पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – वजनमाप खात्यात नोकरभरती घोटाळा झाला आहे. खात्यातील निरीक्षक पदासाठी एकूण १ सहस्र १२८ उमेदवारी अर्ज आले होते; मात्र या उमेदवारांना बाजूला सारून मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांचे स्वीय सचिव आणि इतर ३ पसंतीचे उमेदवार यांना परीक्षेत पूर्ण १०० गुण देण्यात आले, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ‘‘या घटनेवरून वजनमाप खात्यात मोठ्या प्रमाणात नोकरभरती घोटाळा झाल्याचे उघड होते. खात्याने प्रसिद्ध केलेली सर्व पदे रहित करावी आणि संबंधित मंत्र्यांनाही पदावरून निलंबित करावे. शासनाने योग्य कारवाई न केल्यास काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे.’’