हिंदुत्वनिष्ठ चारुदत्त पोतदार यांनी त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त नातेवाईक आणि हितचिंतक यांना भेट म्हणून दिले ‘लव्ह जिहाद’चे ग्रंथ !
कोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार यांच्या मुलाचा विवाह २१ नोव्हेंबर या दिवशी पार पडला. विवाहानिमित्त त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथाच्या ५० प्रती नातेवाईक, तसेच हितचिंतक यांना दिल्या. या प्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित विविध ग्रंथ आणि ‘सनातन पंचांग २०२२’ याचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. (विवाहाच्या निमित्ताने नातेवाईक आणि हितचिंतक यांना ‘लव्ह जिहाद’चे ५० ग्रंथ देणारे, तसेच सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती देणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार यांचे अभिनंदन ! प्रत्येकाने याप्रकारे धर्मकार्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे ! – संपादक)
हे ग्रंथ शिवसेनेचे माजी आमदार श्री. सत्यजित पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य आणि माजी बांधकाम विभाग सभापती श्री. सर्जेराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री. जयवंतराव काटकर, तसेच इतरांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, वैद्य संजय गांधी, माजी नगराध्यक्ष श्री. राजू भोपळे, सनातन संस्थेचे श्री. सुधाकर मिरजकर आणि सौ. सरिता कुलकर्णी उपस्थित होत्या.