जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवामुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी भवन’ फोडले
कार्यकर्त्यांनी आक्रमक होणे पक्षासाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक
सातारा, २३ नोव्हेंबर (वार्ता) – जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळे त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले. त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आणि ‘राष्ट्रवादी भवन’ फोडले. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचे सिद्ध झाले असले, तरी आमदार शशिकांत शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याविषयी मी पवार साहेबांची क्षमा मागतो; पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याविषयी मला शंका आहे’, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हे राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.