सोलापूर येथील एस्.टी. कर्मचार्याने नातेवाईकांना भेटण्यासाठी मद्याच्या नशेत पळवली एस्.टी. बस !
सोलापूर – २० नोव्हेंबर या दिवशी मागील २० वर्षांपासून सुरक्षित सेवा केलेले शरणप्पा बेनुरे या बसचालकाने मद्यधुंद अवस्थेत एस्.टी. बस पळवली. या प्रकरणी बेनुरे याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बेनुरे मद्याच्या नशेत नातेवाईकांना भेटण्यासाठी एस्.टी. घेऊन तेलगाव येथे गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एस्.टी. कर्मचार्यांचा संप चालू असल्यामुळे सर्व बसगाड्या बंद आहेत. घडलेला हा प्रकार अधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित बसचा शोध चालू केला आणि पोलिसांच्या साहाय्याने चालकाला तेलगाव येथे पकडले. बेनुरे याला मंद्रुप पोलिसांनी फौजदार चावडी पोलिसांच्या कह्यात दिले. बेनुरे याला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.