(म्हणे) ‘चीनला दक्षिणपूर्व आशियावर वर्चस्व नको ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग
चीनच्या राष्ट्रपतींच्या या बोलण्यावर लहान मुल तरी विश्वास ठेवील का ? – संपादक
बीजिंग (चीन) – दक्षिणपूर्व आशियावर चीन वर्चस्व गाजवणार नाही, तसेच लहान शेजार्यांवरही वर्चस्व गाजवणार नाही,’ असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्रावर चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ‘असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स’च्या (‘आसियान’च्या) १० सदस्यांसह झालेल्या ऑनलाइन परिषदेत जिनपिंग बोलत होते. चीनच्या तटरक्षक नौकांनी दक्षिण चीन समुद्राच्या किनारपट्टीवर सैनिकांना पुरवठा करणार्या फिलिपाइन्सच्या २ नौका रोखल्या होत्या, तसेच त्या नौकांवर तोफांद्वारे मारा केला होता. फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी परिषदेत या घटनेचा उल्लेख केला.
#China has panicked after seeing global protests over its oppression around the world.https://t.co/LbXN5wY6Sf
— DNA (@dna) November 22, 2021
जिनपिंग पुढे म्हणाले, ‘चीनचा हुकूमशाही आणि सत्तेचे राजकारण यांना कठोर विरोध असून आम्ही शेजार्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवू इच्छितो. आम्ही या प्रदेशात संयुक्तपणे कायमस्वरूपी शांतता राखू इच्छितो.’