केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला अटक
पलक्कड (केरळ) – येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संजीत यांच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) कार्यकर्त्याला अटक केली. या प्रकरणात आरोपी कार्यकर्त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही; कारण त्याची ‘ओळख परेड’ केली जाणार आहे. पीडितेच्या पत्नीने ‘संजीतची हत्या करणार्या लोकांना मी ओळखू शकते’, असे सांगितले होते. जिल्हा पोलीस प्रमुख आर्. विश्वनाथ यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर दोषींना लवकरच अटक करण्यात येईल.
Kerala BJP to protest against death of RSS workers in Palakkad & Thrissur; wants NIA probe https://t.co/kSlPULdCyB
— Republic (@republic) November 21, 2021
भाजप आणि संघ यांनी ‘या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (एस्.डी.पी.आय.चे) कार्यकर्ते या हत्येमागे होते’, असा आरोप केला आहे; मात्र एस्.डी.पी.आय.ने भाजपाचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
राज्यात आतापर्यंत जिहाद्यांकडून संघ परिवाराच्या ५० कार्यकर्त्यांच्या हत्या ! – भाजप
|
भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी नवी देहलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या हत्येचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) देण्याची मागणी केली. सुरेंद्रन् यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की, गेल्या ५ वर्षांत कथित जिहादी गटांकडून केरळमध्ये रा.स्व. संघाचे १० आणि भाजपचे ३ कार्यकर्ते यांच्या हत्या केल्या आहेत. जिहादी संघटनांनी राज्यात आतापर्यंत संघ परिवाराच्या अनुमाने ५० कार्यकर्त्यांची हत्या केली आहे.