गोवा सरकारकडून ४० कार्यक्रमांच्या आयोजनासाठी १२ कोटी ४३ लक्ष रुपये व्यय
सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रशासनाच्या अंतर्गत अनेक यंत्रणा असतांना खासगी आस्थापनांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट कशाला ? – संपादक
पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप शासनाने ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’वर (कार्यक्रमाचे व्यवस्थापन पहाणारी संस्था) १२ कोटी ४३ लक्ष रुपये व्यय केले आहेत. शासनाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी २ ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांना कंत्राट दिले आहे आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी साधारण ३१ लक्ष रुपये व्यय देण्याचे निश्चित केले आहे. हा कार्यक्रम राज्यातील सर्व ४० मतदारसंघांत आयोजित केला जात आहे. शासनाच्या सामान्य व्यवस्थापन विभागाने १० नोव्हेंबर २०२१ या दिवशी ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमासाठी १२ कोटी ४३ लक्ष ८७ सहस्र ४११ रुपयांच्या व्ययाला संमती दिली आहे.