‘आंचिम’ला नवीन उंचीवर नेणार ! – अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री
५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरामा’ विभागाचे उद्घाटन
पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – चित्रपटाचा आशय महत्त्वाचा आहे. दर्जेदार आशय असलेला आणि भक्कम कथानक असलेला चित्रपट राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांना आवडतो. आपल्याकडे कौशल्य आणि प्रतिभा भरपूर आहे. आपण सर्वांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (‘आंचिम’ला) नवीन उंचीवर नेऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला.
(सौजन्य : DD INDIA)
५२ व्या ‘आंचिम’मध्ये ‘इंडियन पॅनोरामा’ विभागाचे २१ नोव्हेंबर या दिवशी उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी हा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची विशेष उपस्थिती होती.