हिंगोली येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हादरे बसल्याने रायफलमधून गोळी सुटून सैनिकाचा मृत्यू !
हिंगोली – जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या शिबिरातील सैनिक पप्पाला भानूप्रसाद (वय ३५ वर्षे) हे २२ नोव्हेंबर या दिवशी पहाटे ३.३० वाजता डिपार्टमेंटच्या गाडीत भाग्यनगरहून नांदेड येथे आलेल्या आधुनिक वैद्याला घेण्यासाठी येत होते. चालक आणि सैनिक गाडीतून जात असतांना त्यांची गाडी खड्ड्यात आदळल्याने भानूप्रसाद यांच्या ‘इंसास रायफल’मधून गोळी सुटून ती थेट त्यांच्या छातीत घुसली. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी भरती करण्यात आले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. डोंगरकडा ते नांदेड या रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने ही घटना घडली. भानूप्रसाद हे आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहेत. (या प्रकरणी रस्त्यांवरील खड्डे न बुजवणार्या सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित दोषी अभियंत्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे. – संपादक)