पाकिस्तानच्या ग्वादर शहरात शेकडो स्थानिक लोकांकडून ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’च्या विरोधात निदर्शने

ग्वादर शहरात स्थानिक लोकांकडून ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’च्या विरोधात निदर्शने

ग्वादर (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमधील ग्वादर शहरामध्ये स्थानिक लोकांनी ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’च्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली. स्थानिक लोक पूर्वीपासूनच या मार्गाच्या विरोधात आहेत. चीनने येथील ग्वादर बंदर विकासासाठी कह्यात घेतल्यामुळे येथील मासेमार्‍यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे तेही या महामार्गाच्या विरोधात निदर्शने करत आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, त्यांना आरोग्य आणि शिक्षण यांसारखे मूलभूत सोयीही पुरवण्यात आलेल्या नाहीत.

या आंदोलनाचे नेतृत्व ‘जमात-ए-इस्लामी बलुचिस्तान’चे प्रांतीय सरचिटणीस मौलाना हिदायत-उर्-रहमान यांनी केले. ते म्हणाले की, जोपर्यंत आमच्या मागण्यापूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा विरोध चालूच रहाणार आहे. सरकार या भागात रहाणार्‍या लोकांच्या समस्या दूर करण्याविषयी गंभीर नाही.