भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना दिले जाणार ‘हलाल मांस!’
|
नवी देहली – भारतीय क्रिकेट संघाला स्पर्धेच्या कालावधीत गोमांस किंवा डुकराचे मांस खाण्यास दिले जाणार नाही; मात्र अन्य वेळी देण्यात येणारे कोणतेही मांस हे ‘हलाल’ मांस असणार आहे, असे ‘इंडिया टुडे’ समुहाच्या ‘स्पोर्ट्स तक’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.
Indian cricketers get their new dietary plan, will be able to eat only ‘Halal certified’ meat now: Detailshttps://t.co/OL29D0LEbg
— OpIndia.com (@OpIndia_com) November 20, 2021
‘हलाल’ मांस म्हणजे काय ?
हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे त्या प्राण्याचे मोठ्या प्रमाणात रक्त वाहून त्याचा तडफडून मृत्यू होतो. अशा तडफडून मारलेल्या प्राण्याच्या मांसाला ‘हलाल मांस’ म्हणतात. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो.