अखेर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे लोकांना आवाहन !
कीर्तनांच्या माध्यमातून कोरोनाच्या लसीविषयी जनजागृती !
जालना – कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणारे कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी अखेर येथील बदनापूर तालुक्यातून ‘कोरोनाची लस घ्या’, असे आवाहन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना केले आहे. जालना जिल्ह्यातून त्यांनी कोरोना लसीविषयी जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी ‘हरीपाठाची एक आणि २ कोरोना लस घ्या, कोरोनात तणावमुक्त रहा’, असे आवाहन करत कोरोना जनजागृतीला प्रारंभ केला.
या वेळी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुकही केले. ‘ह.भ.प. इंदुरीकर महाराज दिवसांतील ४ कीर्तनांच्या माध्यमातून कोरोनाची लस घेण्यासाठी जनजागृती करणार आहेत’, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.