अध्यात्म अनंताचे शास्त्र आहे !
आता माझे वय ७९ वर्षे आहे. गेली ४० वर्षे मी अध्यात्माचा अभ्यास केला. आताही प्रतीदिन ८-१० घंटे अभ्यास करत असतांना माझ्या लक्षात आले की, अध्यात्माच्या अनंत ज्ञानापैकी १ टक्का ज्ञानही मी अजून वाचलेले नाही ! याउलट विज्ञानाच्या एखाद्या शाखेत एखाद्याने पीएच्.डी. (डॉक्टरेट पदवी) मिळवली, तर तो स्वतःकडे अभिमानाने पहातो आणि ‘इतरांनीही महत्त्व द्यावे’, असे त्याला वाटते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)