श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव !
कोल्हापूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून शिवतीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी कोल्हापूर शहरातील, तसेच पन्हाळा विभागातील धारकर्यांनी प्रत्येक पौर्णिमेला श्री शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या पूजेसमवेत सायंकाळी शिववंदना वहाण्याचा संकल्प केला आहे. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहर कार्यवाह आशिष लोखंडे, रोहित अतिग्रे, सुमेध पोवार, अवधूत चौगले, केदार अतिग्रे, अथर्व कोल्हापूरे, प्रथमेश मोरे, दत्ता पाटील, अमित बामणे, नीलेश पाटील, सचिन पोवार, सूरज पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.