नेदरलँडमध्ये कोरोनाविषयीच्या निर्बंधांच्या विरोधात नागरिकांचे हिंसक आंदोलन
पोलिसांच्या गोळीबारत अनेक जण घायाळ
अॅमस्टरडम (नेदरलँड) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात काही जण घायाळ झाले. या हिंसाचारामध्ये दुकानांची तोडफोड, दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांवर आक्रमणे करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ५१ जणांना अटक केली आहे.
Rotterdam police open fire as protest over Covid curbs turns violent, 7 injured https://t.co/jzHL00Cpm1
— Hindustan Times (@HindustanTimes) November 20, 2021