भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची हिंदु नावाने कागदपत्रे बनवून त्यांना विदेशात पाठवणार्या टोळीला अटक
अशा प्रकारे लोकांना विदेशात पाठवता येऊ शकते, यावरून भारतातील शासकीय यंत्रणा किती तकलादू आणि भ्रष्ट आहे, हे स्पष्ट होते ! यातील दोषींना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना भारतीय हिंदूंची नावे देऊन त्यांना विदेशात पाठवणार्या एका टोळीला अटक केली. या प्रकरणी सहारणपूर येथून अजय घिल्डियाल याला अटक करण्यात आली आहे. तो एअर इंडियाच्या कस्टमर केअर विभागात काम करत होता. तो देहलीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्ष २०१६ पासून कार्यरत आहे. त्याने आतापर्यंत ४० लोकांना बनावट कागदपत्रांद्वारे स्पेन, ब्रिटन आदी युरोपमधील देशांत पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
2 held for trafficking Bangladeshi citizens https://t.co/JVoE3rWqPB
— TOI Lucknow News (@TOILucknow) November 11, 2021
१. या टोळीला साहाय्य करणार्या विक्रम याला गाझियाबाद,तर समीर मंडल याला बंगालच्या २४ परगणा येथून अटक करण्यात आली. समीर ‘ट्रॅव्हल एजन्सी’ चालवतो. तो घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना भारतीय नागरिकता देण्याचे काम करत होता. याच नागरिकतेद्वारे त्यांना विदेशात पाठवण्यात येत होते. विक्रमच्या चौकशीनंतर अजय याला अटक करण्यात आली.
२. अजय याला वरील कामासाठी एका व्यक्तीमागे १५ सहस्र रुपये मिळत होते. यातील काही पैसे अन्य कर्मचार्यांनाही वाटले जात होते. या प्रकरणात गुरप्रीत हाही अरोपी आहे. तो लंडन येथील पारपत्र कार्यालयात काम करतो. अजय त्याच्या संपर्कात होता. तो अजय याला यामध्ये साहाय्य करत होता.
३. ही टोळी घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांचे हिंदु नावाने बनावट आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र आदी बनवते. यासह लस घेतल्याचेही बनावट अहवाल बनवते. या टोळीतील अन्य लोकांचा शोध पोलीस घेत आहेत.