पिंपरी (जिल्हा पुणे) येथील पोलीस भरती लेखी परीक्षेत उमेदवाराच्या मास्कमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस’ सापडले !
पिंपरी (जिल्हा पुणे) – पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एका परीक्षार्थीने तोंडाला लावलेल्या मास्कमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस’ बसवल्याचा प्रकार हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर घडला. त्यामध्ये एक सिमकार्डही मिळाले आहे. आरोपी उमेदवार परीक्षा केंद्रावरून पळून गेला असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची तपासणी चालू असतांना आरोपीच्या मास्कचे वजन अधिक असल्याचे लक्षात आले. त्याची तपासणी केली असता वरील प्रकार उघडकीस आला.