एस्.टी. कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणासाठी पर्याय सुचवला आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाचे प्रकरण

नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य करतांना म्हटले, ‘‘कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण यांच्यातील मध्यम मार्ग मी सुचवला असून सरकारने निर्णय घ्यावा.’’ फडणवीस एका कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, महामंडळाच्या कर्मचार्‍यांविषयी राज्य सरकारची भूमिका जीवघेणी आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह झालेल्या बैठकीत प्रवासी कर न्यून केल्यास सरकारकडून केवळ १०० कोटी रुपये घ्यावे लागतील, असे सुचवण्यात आले. याच बैठकीत कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण यांतील मध्यममार्ग सुचवला आहे.’’