हिंदुत्वाची तुलना जिहादी आतंकवादी संघटनांशी करणे, हे आहे काँग्रेसवाल्यांचे खरे स्वरूप ! त्यांना पुनःपुन्हा निवडून देणारी जनताच याला उत्तरदारयी !
‘गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरूपामुळे ऋषिमुनी आणि संत यांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म अन् हिंदुत्व बाजूला सारले गेले आहे. हे आक्रमक हिंदुत्व ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ यांसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरूपासारखेच आहे’, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या नव्या पुस्तकामध्ये केले आहे.’