एस्.टी. कर्मचार्यांच्या संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक !
मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांच्या संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक चालू आहे. त्याला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एस्.टी. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत; मात्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही.
संप करणार्या कर्मचार्यांनी आक्रमक होऊन अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढण्याची चेतावणी दिली होती. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. मोर्चा काढणार्या कर्मचार्यांना आझाद मैदानावरच अडवण्यात आले. संपासाठी राज्यातून येणार्या शेकडो कर्मचार्यांना मुंबईच्या वेशीवर पोलिसांनी कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. सरकारच्या दडपशाहीमुळे कर्मचार्यांनी घोषणाबाजी केली.