(म्हणे) ‘धर्मांतरविरोधी कायद्यामुळे कर्नाटकात अराजकता निर्माण होईल ! – आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो
कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित धर्मांतरविरोधी कायद्याला बेंगळुरूच्या आर्चबिशपांचा विरोध
|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्याची घोषणा नुकतीच केली होती. यास बेंगळुरूचे आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो यांनी विरोध करून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, हा कायदा भेदभाव करणारा असेल आणि त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे हनन होईल, तसेच राज्यातील शांतता आणि एकता यांना हानी पोचेल. यामुळे राज्यात अराजकता निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचा कायदा आणणे अनावश्यक आहे.
Archbishop of Bengaluru objects ‘anti-conversion bill’ in Karnataka; writes to CM Bommai https://t.co/LF55XpEpyH
— Republic (@republic) November 19, 2021
१. या पत्रात आर्चबिशप मचाडो यांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ आणि २६ चा संदर्भ देत ‘या कलमांद्वारे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे’, असे म्हटले आहे.
२. आर्चबिशप मचाडो यांनी ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च यांचे सर्वेक्षण करण्याच्या सरकारच्या निर्णयालाही विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जनगणनेच्या वेळी सरकारने याविषयीची माहिती गोळा केली असल्याने पुन्हा गोळा करण्याची आवश्यकता नाही.