धर्मादाय ट्रस्टलाही आता १८ टक्के वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार !

नवी देहली – ‘अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग’च्या (ए.ए.आर्.च्या) महाराष्ट्र खंडपिठाने दिलेल्या निर्णयामुळे आता धर्मादाय ट्रस्टलाही वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) भरावा लागणार आहे. ‘धर्मादाय ट्रस्ट त्यांना मिळालेले अनुदान आणि धर्मादाय नसलेल्या देणग्यांवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर भरण्यास पात्र आहेत’, असे या निर्णयात म्हटले आहे.

देणगीविषयी ए.ए.आर्.ने सांगितले की, जर देणगीचा उद्देश धर्मादाय असेल, कोणताही व्यावसायिक लाभ करून देणारा नसेल आणि विज्ञापन करत नसेल, तर त्यावर जी.एस्.टी. लागू होणार नाही. इतर सर्व देणग्यांवर १८ टक्के जी.एस्.टी. लागू होईल.