एस्.टी.च्या खासगीकरणाच्या पर्यायांविषयी अभ्यास चालू ! – अनिल परब, परिवहनमंत्री
मुंबई – सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हाही एक पर्याय आहे; मात्र याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. अन्य राज्यांमधील परिवहन मंडळांचा अभ्यास करून आपण आपल्या राज्यांविषयीचा निर्णय घेऊ. याविषयी अधिकार्यांकडून अहवाल सिद्ध करण्याचे काम चालू आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
(सौजन्य : Zee 24 Taas)
या वेळी अनिल परब म्हणाले, ‘‘कामगारांनी कामावर जावे, हानी होणार नाही, असे मी पुन्हा आवाहन करतो. राजकीय पक्ष तुमचा वापर करेल; मात्र तुमची हानी भरून निघणार नाही. कामगार त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. सरकार म्हणून लोकांचे दायित्व जसे आमचे आहे, तसेच कामगारांचेही दायित्व आमचेच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार चालू आहे.’’