नामजपाच्या वेळी मानसपूजा करतांना भगवंताच्या द्विभुजधारी तेजस्वी रूपाचे दर्शन होणे
नामजपाच्या वेळी मानसपूजा करतांना भगवंताचे द्विभुजधारी तेजस्वी रूप दिसणे, ते डोळ्यांनी पाहू शकत नसल्याने देवाला मूळ रूपात येण्याची प्रार्थना करणे आणि त्यानंतर ते अदृश्य होणे
‘४.८.२०२० या दिवशी संध्याकाळी मी भगवान श्रीकृष्णाचा नामजप करतांना मानसपूजा करत होते. मानसपूजा संपल्यानंतर मी सूक्ष्मातून देवाच्या चरणांजवळ बसले. तेव्हा मला भगवंताचे द्विभुजधारी रूप दिसले. त्या तेजाला मी डोळ्यांनी पाहू शकत नव्हते, इतके ते तेजस्वी रूप होते. नंतर अकस्मात् एक दिव्य प्रकाश आला आणि त्यात मला देवाचे विश्वरूप दिसले. त्याचे मुखमंडल श्री महागणपतीचे होते; म्हणून मी त्याला प्रिय असलेल्या दूर्वा, लाल फुलांचा हार, लाडू आणि मोदक अर्पण केले. नंतर माझे लक्ष त्याच्या हातांकडे गेले. त्याच्या हातांत शंख, चक्र आणि गदा, अशी श्रीविष्णूची आयुधे होती. मी देवाला प्रार्थना केली, ‘तुझे हे रूप पहाण्याची माझी पात्रता नाही. मला तुझे श्यामरूपच दाखव अन् त्या रूपाच्या चरणांशी मला ठेव. मला या मोहमायेतील काही नको. मी धन्य आणि कृतार्थ झाले आहे.’ त्यानंतर ते रूप अदृश्य झाले.
‘देवा, तुझ्या चरणांविना मला काहीच नको’, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. रक्षंदा संतोष बलुतकर, अंबाजोगाई, बीड. (४.८.२०२०)
|