एस्.टी.च्या भरतीतील प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना सेवेत घेण्याची शक्यता !
कर्मचार्यांना कामावर उपस्थित रहाण्याविषयी नोटीस
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाने कर्मचार्यांचा संप मोडीत काढण्यासाठी रोजंदारीवर काम करणार्या २ सहस्र २९६ कर्मचार्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. उर्वरित कर्मचारी कामावर न आल्यास नवीन कामगारांना कामावर घेण्याचे संकेत परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. मागील १२ दिवसांपासून कर्मचार्यांचा संप चालू आहे.
कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा, एबीपी माझा’ला एसटी महामंडळातील वरिष्ठ सूत्रांची माहितीhttps://t.co/vqa5tPiaCU @nileshbudhawale
— ABP माझा (@abpmajhatv) November 18, 2021
राज्यशासनामध्ये एस्.टी.चे विलीनीकरण करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एस्.टी. कर्मचार्यांचे आंदोलन चालू आहे. ‘सर्व कर्मचार्यांनी २४ घंट्यांत कामावर उपस्थित रहावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल’, अशी नोटीस बजावण्यात आली होती. ‘कर्मचारी कामावर न आल्यास वर्ष २०१६-१७ आणि २०१९ मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल’, असे परब यांनी सांगितले.