देशाच्या रक्षणासाठी असा विचार तरी कुणी करील का ?

चीनची भिंत : ‘१५०० मैल, म्हणजे पृथ्वीच्या परिघाच्या बाराव्या हिश्श्याइतकी जागा व्यापणारी, मानवाने बांधलेली अशी ही सर्वांत मोठी वास्तू होय. या भिंतीत २४,००० दरवाजे आणि मिनार आहेत. भिंतीची सरासरी उंची २५ फूट असून पायथ्याशी तिची रुंदी २० ते ३० फूट इतकी आहे. या भिंतीवरून एकाच वेळी एका रेषेत अनेक घोडेस्वार आपले घोडे दौडवू शकतात. इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात चीनचा राजा शिने व्हांग टी याने बांधकामास प्रारंभ केलेल्या या भिंतीचे काम पुढे १७०० वर्षांपर्यंत चालू राहिले आणि त्याला शेवटचा हात मिंग राजघराण्याकडून (इ.स. १३६८ – १६४४ मध्ये) दिला गेला.’

(श्री गजानन आशिष, जानेवारी २००२)