माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांना पोलीस कोठडी !
माळशिरस (जिल्हा सोलापूर) – रस्त्याच्या कामाचे देयक अधिकोशात जमा करण्यासाठी आणि नवीन काम देण्यासाठी १ लाख २६ सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर या दिवशी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माळशिरस नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. त्यांना माळशिरस जिल्हा न्यायालयात उपस्थित केले असता, जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म.ना. पाटील यांनी वडजे यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.