माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन तूर्तास स्थगित !

नवी मुंबई – शासन निर्णयानुसार कांदा-बटाटा बाजार आवारात कांदा-बटाटा मालांच्या ५० किलोहून अधिक वजनाच्या गोणी उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने व्यापारी आणि माथाडी कामगार संघटना यांची बैठक घेऊन गोणी भरणार्‍या घटकांमध्ये जागृती करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. त्यानंतर ५० किलोहून अधिक वजनाच्या गोणी उचलण्यास प्रारंभ झाल्याने व्यापार सुरळीत चालू झाला आहे, अशी माहिती माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली.