आपत्काळात दिशादर्शन करणारी संतांची अमृतवाणी !
सध्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधनाविषयक ‘ऑनलाईन’ सत्संगांचे आयोजन करण्यात येत आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘जागतिक संकटे : धर्मविषयक दृष्टीकोन आणि संकट रक्षणाचे उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.
मानवजातीच्या रक्षणाच्या हेतूने संत आणि महापुरुष यांनी वर्तवलेली भविष्यवाणी
१. संत
१ अ. प.पू. गगनगिरी महाराज : प.पू. गगनगिरी महाराजांनी म्हटले होते, ‘पुढे एवढा वाईट काळ येणार आहे की, आम्हा संतांनाही वाटेल, ‘आता लवकर मरण आले, तर अधिक चांगले झाले असते.’ अन्य अनेक संतांनीही अशाच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
१ आ. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले : तिसरे विश्वयुद्ध महाभयानक होईल. यामध्ये भारत ओढला जाईल. परमाणू बॉम्बने होणारा संहार भीषण असेल. गावेच्या गावे उजाडतील. तिसर्या विश्वयुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. त्यासाठी अनेक संतांची आवश्यकता असेल. त्यासाठी साधकांनी साधना वाढवली पाहिजे.
१ इ. कर्नाटकमधील पू. भगवान महाराज यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ यांनी वर्ष २०१२ आणि वर्ष २०१९ मध्ये सांगितलेले भाकित
१. सुनामी येईल, चक्रीवादळ आणि भूकंप येईल. जग जळून खाक होईल.
२. भारतावरही संकट येईल. आतंकवादी मोठा घातपात करतील. नरसंहार होईल. दिवसाढवळ्या चोर्या होतील आणि लुटालूट होईल. महाराष्ट्राच्या कृष्णा नदीच्या काठी ९ लक्ष बांगड्या फुटतील.
३. नद्या आटतील. पेलाभर पाणीही विकत घ्यावे लागेल. (भावार्थ : पाणी महाग होईल आणि महागाईही पुष्कळ होईल.)
४. औषधे मिळणार नाहीत. रोग-व्याधी वाढतील. डॉक्टर नाईलाजाने हात वर करतील. चालता – बोलता मनुष्याचे प्राण जातील.
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.