रामनाथीच्या गुरुदेवा, शरण मी आले तुला ।
‘२०.८.२०२० या दिवशी मी नामजप करतांना माझे मन पुष्कळ अस्वस्थ होते. मला काहीच सुचत नव्हते. ‘गुरुदेवा, कशी शरण येऊ तुजला’, अशा विचाराने मला पुढील ओळी सुचल्या.
रामनाथीच्या गुरुदेवा, शरण मी आले तुला ।
शरणागतीचा भाव ठेवून चरणी घे तुझ्या ।। १ ।।
करवूनी घेतली नामसाधना । आता लवकर घे चरणा ।
रामनाथीच्या गुरुदेवा, शरण मी आले तुला ।। २ ।।
सत्संगातून देई ज्ञान, अल्प होई त्रास ।
त्यागातून होई साधना, शरण मी आले तुला ।
रामनाथीच्या गुरुदेवा, शरण मी आले तुला ।। ३ ।।
आध्यात्मिक त्रास नष्ट केलास तू ।
श्रीविष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण अन् सत्यनारायणाचा अवतार तू ।
धन्य तुझे श्रेष्ठत्व, शरण मी आले तुला ।। ४ ।।
– सौ. मंगल परशुराम खटावकर, मिरज (सप्टेंबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |