६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. चैतन्य तागडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
१. चांगले वक्तृत्व
‘सध्या ‘कोरोना’च्या दळणवळण बंदीमुळे जिल्ह्यात वाचकांचे ‘ऑनलाईन’ सत्संग चालू आहेत. त्या सत्संगात चैतन्यदादा बोलतांना त्यांचा प.पू. गुरुदेवांप्रती भाव आणि दृढ श्रद्धा जाणवते. ते जिज्ञासूंना चांगल्या प्रकारे उत्तरे देतात. दादा जिज्ञासूंचे मोजक्या शब्दांत कौतुक करून त्यांना बोलते करतात. त्यांचे हे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
२. चांगले सूत्रसंचालन करणे
चैतन्यदादा यांच्या नावातही ‘चैतन्य’ आहे. दादा सभेचे सूत्रसंचालन करतांना त्यांच्या बोलण्यात चैतन्य जाणवते. ते अत्यंत मार्मिकपणे वक्त्यांच्या भाषणांचे सार सांगतात.
३. क्षात्रभाव
ते राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसंबंधी घोषणा देतांना दादांमध्ये क्षात्रतेज जाणवते. त्यामुळे उपस्थितांमध्ये वीरश्री निर्माण होऊन अंगावर रोमांच उभे रहातात.
४. मुलावर चांगले संस्कार करणे
दादा व्यवसायात पुष्कळ व्यस्त असल्यामुळे त्यांच्या मुलाला थोडाच वेळ देऊ शकतात, तरी मुलाला त्यांच्याविषयी अतिशय प्रेम आणि अभिमान वाटतो. मुलगा त्यांचे अनुकरण करतो. सभेचे सूत्रसंचालन आणि घोषणा हे सर्व त्यांच्या मुलाचेही तोंडपाठ असते.’
– सौ. शारदा हुमनाबादकर, पुणे (३.७.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |