समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून साधू-संतांचा ‘चिलिमजीवी’ असा संतापजनक उल्लेख !
याविरोधात अखिल भारतीय संत समिती उत्तरप्रदेशातील घराघरांत जनजागरण अभियान राबवणार !
हिंदूंच्या साधूसंतांचा असा अवमान केल्याच्या प्रकरणी अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक करायला हवी होती ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग सर्वत्र दिसत आहेत. एक रंगवाले ‘चिलिमजीवी’ लोकांच्या जीवनात सुख आणू शकत नाही. आम्ही समाजवादी सर्व रंगांद्वारे परिपूर्ण आहोत, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करतांना केली. ते गाझीपूर येथे एका सभेत बोलत होते. या विधानावरून यादव यांच्यावर टीका होत आहे. अखिल भारतीय संत समितीने अखिलेश यादव यांना या विधानावरून क्षमा मागण्यास सांगितले आहे.
अखिलेश यादव ने कहा था कि एक रंग वाले चिलमजीवी समाज का भला नहीं कर सकते। हम समाजवादी बहुरंगी सभी रंगों से भरे हुए हैं।https://t.co/QekUCkKBRA
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 19, 2021
अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी म्हटले की, संत समाज संपूर्ण उत्तरप्रदेशमधील घराघरांत जाऊन हिंदू आणि त्यांच्या परंपरा यांविषयी आक्षेपार्ह विधाने करणारे ढोंगी समाजवादी अन् काँग्रेस यांच्या विरोधात जनजागरण अभियान राबणार आहे.