चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता स्वीकारणार का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा प्रश्न
नवी देहली – चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वीकारणार का ? आणि चीनच्या कह्यात असलेली प्रत्येक इंच भूमी परत मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार प्रयत्न करतील का ?, अशी विचारणा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांनी ३ कृषी कायदे रहित करण्याची घोषणा केल्यानंतर ट्वीट करून केली.
Will Modi now admit also that China has grabbed our territory and Modi and his Govt will strive to get back every inch in China’s possession?
— Subramanian Swamy (@Swamy39) November 19, 2021
केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर आता भारत-चीन सीमेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. #Farmlawsrepealed #PMModi https://t.co/4E1oMSEbG6
— Lokmat (@lokmat) November 19, 2021
भारत आणि चीन सीमा प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. स्वामी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ‘नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही’, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.