‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांसाठी (वेटरसाठी) असलेला साधूंचा वेश पालटणार ! – आय.आर्.सी.टी.सी.
खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे साधक डॉ. अशोक शिंदे यांनी घेतलेल्या आक्षेपाला दिले उत्तर !
हिंदूंच्या साधूंच्या होणार्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवणारे सनातनचे साधक डॉ. अशोक शिंदे यांचे अभिनंदन ! सर्वच हिंदूंनी यातून बोध घ्यावा ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारतीय रेल्वेने नुकत्याच चालू केलेल्या ‘रामायण एक्सप्रेस’ या रेल्वेगाडीतील वाढप्यांना (वेटरना) साधूसारखा गणवेश दिला आहे.
यावर आक्षेप घेत सनातनचे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक डॉ. अशोक शिंदे यांनी ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’च्या (आय.आर्.सी.टी.सी.च्या) मुख्य व्यवस्थापकांना पत्र पाठवून हा गणवेश पालटण्याची मागणी केली.
(सौजन्य : wow video)
याची नोंद घेत आय.आर्.सी.टी.सी.चे सह मुख्य व्यवस्थापक अच्युत सिंह यांनी डॉ. शिंदे यांच्या पत्राला उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही वाढप्यांच्या गणवेशाच्या संदर्भातील नोंद यापूर्वीच घेतली आहे. त्याविषयी योग्य कार्यवाही करून सर्व कर्मचार्यांचा गणवेश पालटणार आहोत.