‘श्री आसारामजी बापू सेवा समिती’च्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या रक्तपेढीस १५ ‘बेड’ प्रदान !
कोल्हापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – सध्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या रक्तपेढीस रक्तदान शिबीर घेण्यासाठी घडी घालता येतील आणि सहज वाहून नेता येणार्या बेडची कमतरता होती, हे लक्षात घेऊन ‘श्री आसारामजी बापू सेवा समिती’च्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या रक्तपेढीस १५ अद्ययावत ‘बेड’ अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याकडे प्रदान करण्यात आले. या वेळी श्री. राजमोहन स्वामी यांनी श्री आसाराम बापू सेवा समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी ‘श्री आसारामजी बापू सेवा समिती’च्या उपक्रमाचे कौतुक करून इतर संस्थांनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. या वेळी डॉ. रवींद्र रामटेके, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सुप्रिया लोखंडे, संभाजी डोंगरे यांच्यासह श्री आसारामजी बापू सेवा समितीचे भावेश ठक्कर, प्रकाश अस्वले, प्रा. डॉ. मारुती वैराट, कृष्णात साठे, संजय देशपांडे उपस्थित होते.