कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्या रझा अकादमीवर बंदी घाला !
हिंदु जनजागृती समितीचे वर्धा, चंद्रपूर, राजुरा आणि धुळे येथे प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन
वर्धा, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करावी अन् त्यांना चिथावणी देणार्या रझा अकादमी या संस्थेवर बंदी घालावी, यासाठी मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वर्धा, चंद्रपूर आणि राजुरा येथे जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री अन् गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन वर्धा येथे निवासी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार चंद्रपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी विद्युत खेरवडकर आणि राजुरा (जि. चंद्रपूर) येथे तहसीलदार श्री. नागेश गाडे यांनी स्वीकारले.
राजुरा येथे निवेदन देतांना सर्वश्री अंकुश वाटोळे, आशिष वाढई, सुभाष रामगिरवार, सोमेश्वर आईटलावार, वैभव आईटलावार, जयपूरकर, कैलास कार्लेकर आदी हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
वर्धा येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक जमनारे, श्री. पंडित थोटे, सौ. विजया भोळे, सौ. भक्ती चौधरी आदी उपस्थित होते. चंद्रपूर येथे निवेदन देतांना श्री. शेखर लिमजे, राहुल वनकर, सौ. ऋतुजा वनकर, सौ. चंदनखेडे आदी उपस्थित होते.
धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदू ऐकता आंदोलन पक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र सेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रप्रेमी, तसेच धर्मप्रेमी नागरिक यांनी निवेदन दिले.