स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया संबंधित व्यक्ती अन् तिच्या संपर्कात येणार्यांनाही आनंद देणारी असते !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा विविध स्तरांवर हानी सहन करावी लागते. ही हानी त्याच्यापुरतीच मर्यादित न रहाता तिचे दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्यांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास त्याचा लाभ केवळ त्या व्यक्तीपुरताच मर्यादित न रहाता तिच्या संपर्कात येणार्यांनाही होतो. त्याचप्रमाणे तिचे स्वभावदोष आणि अहं उणावल्यामुळे तिच्यातील चैतन्य वाढून इतरांना तिच्या संपर्कात आल्यावर आध्यात्मिक स्तरावरील आनंदही जाणवू लागतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.९.२०२१)