मशिदीजवळ डीजे बंद करण्यास सांगणार्यास धर्मांधांकडून मारहाण
ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) – मशिदीजवळ ‘डीजे’ (ध्वनीक्षेपक यंत्रणा) बंद करण्यास सांगितल्यावरून धर्मांधांनी त्यांच्याच समाजाच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नासिर, नाझिम, आरिफ, रिझवान, शाहबाज आणि इतरांवर प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवला असून अधिक अन्वेषण करण्यात येत आहे.
मस्जिद के पास DJ बंद करने को कहा, नासिर और उसके साथियों ने घर में घुसकर मीनस के परिवार को पीटा#UttarPradesh https://t.co/hspsg4yXCx
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 18, 2021
१५ नोव्हेंबर या दिवशी नेहरवाला येथून रजपुरा गावामध्ये ‘डीजे’सह एक वरात आली होती. ही वरात गावातील मशिदीजवळून जात असतांना मीनस या मुसलमान समाजाच्या व्यक्तीने ‘डीजे’ बंद करायला सांगितला. त्यामुळे आरोपींनी दंडुके आणि रॉड यांच्या साहाय्याने मीनसला मारहाण केली. मीनस यांचे ‘जनरल स्टोअर्स’ आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपींनी त्यांच्या घरातही प्रवेश केला आणि त्यांची पत्नी आणि पुतण्या यांना मारहाण केली. या आक्रमणात मीनसच्या परिवारातील ३ जण घायाळ झाले आहेत.