भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ११७ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरणार्या धर्मांधाला वाहन जप्त करण्याची नोटीस !
११७ वेळा नियमांचे उल्लंघन होईपर्यंत पोलीस झोपले होते का ?
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील वाहतूक पोलिसांनी फरीद खान नावाच्या व्यक्तीला शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवल्यावरून पकडले होते. ११७ वेळ त्याने नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर दंड ठोठवण्यात आला होता; मात्र यांपैकी एकही दंड त्याने भरलेला नसल्याचे उघड झाले.
The #Hyderabadtrafficpolice seized the two-wheeler of a man who was found with 117 pending #challans for the last seven years in connection with various traffic violations in the city.https://t.co/syHma9cZ4k
— Telangana Today (@TelanganaToday) November 17, 2021
असा अनुमाने ३० सहस्र रुपयांचा दंड त्याच्याकडून वसूल करणे शेष आहे. या वेळी पोलिसांनी त्याचे दुचाकी वाहन जप्त करून सर्व दंड भरून वाहन नेण्यास सांगितले. खानला यासाठी एक नोटीस पाठवण्यात आली. यात सांगितले गेले, ‘दंड भरा अन्यथा वाहन जप्त करण्यासाठी आरोपपत्र प्रविष्ट केले जाईल.’ वाहतूक नियमानुसार जर एखाद्याने १० पेक्षा अधिक वेळाचे चलन भरले नसेल, तर पोलिसांना त्याचे वाहन जप्त करण्याचा अधिकार आहे.