परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !
रामनाथी (गोवा), १७ नोव्हेंबर (वार्ता.) – संतपती पू. नीलकंठ दीक्षित यांची शिष्यभावाने सेवा करणार्या, व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्या.
कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.११.२०२१) या दिवशी असलेल्या त्यांच्या ८९ व्या वाढदिवसाच्या दिनी सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंददायी घोषणा केली. ही वार्ता ऐकून श्रीमती विजया दीक्षित यांचा भाव दाटून आला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. आजी यांना पुष्पहार घालून, तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षणही केले.