हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी संपर्क अभियानाद्वारे जागृती !
व्यापारी, व्यावसायिक, तसेच अन्य मान्यवर यांचा उत्स्फूर्त अन् कृतीशील प्रतिसाद
हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे, हे मोठे जागतिक षड्यंत्र आहे. अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जागृती केली. या अभियानात उद्योजक, व्यापारी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी असे समाजातील सर्व प्रकारचे घटक सहभागी झाले होते. या अभियानात अनेक उद्योजक आणि व्यापारी यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. यासंदर्भातील विश्लेषण पुढे दिले आहे.
धाराशिव
१. धाराशिव येथे झालेल्या अधिवक्त्यांच्या बैठकीत अधिवक्ता (कीर्तनकार) गजानन चौगुले आणि अधिवक्ता अजित कुलकर्णी यांनी आम्ही ‘हलाल अर्थव्यवस्थे’ला विरोध करणारे निवेदन गृहमंत्री, पंतप्रधान आणि वाणिज्यमंत्री यांना पाठवतो’, असे आश्वासन दिले, तर कीर्तनकार गजानन चौगुले यांनी ‘मी माझ्या कीर्तनामध्ये हलाल संदर्भात प्रबोधन करतो’, असे आश्वासन दिले.
२. तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे महंत मावजीनाथ महाराज आणि श्री. नागनाथ भांजी यांची भेट घेण्यात आली. या वेळी श्री. नागनाथ भांजी म्हणाले, ‘‘यापुढे आम्ही प्रत्येक व्यापार्याकडे जाऊन ‘हलाल’ची उत्पादने परत पाठवण्याचे नियोजन करू आणि ते उत्पादन विक्रीसाठी घेणार नाही.’’ त्याप्रमाणे श्री. नागनाथ भांजी यांनी कृतीला प्रारंभही केला आहे.
‘हलाल प्रमाणपत्रा’विषयीची जागृती करण्याचा समितीचा निर्णय स्तुत्य ! – आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपपरांडा (जिल्हा धाराशिव) – येथील भाजपचे आमदार आणि सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी व्यस्त असूनही समितीच्या कार्यकर्त्यांना १ घंटा वेळ दिला. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ हेही भेट देण्यात आले, तसेच त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्री यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात स्वत: पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. श्री. सुजितसिंह ठाकूर म्हणाले, ‘‘तुम्ही हलाल प्रमाणपत्राविषयी जागृती करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. तुमच्या या मोहिमेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.’’ सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा प्रसार व्हावा या हेतून चालू केलेल्या ‘ज्ञानशक्ती अभियाना’च्या संदर्भात श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी स्वत:च्या ‘लेटरहेड’वर २५ ग्रंथांलयांना १२ सहस्र ५९५ रुपयांचे २५ संच आमदार निधीतून देण्याची शिफारस केली, तसेच याविषयीचे पत्र त्यांनी जिल्हाधिकार्यांना पाठवले. ‘हलाल’ उत्पादने खरेदी करू नयेत, यासाठी व्यावसायिकाकडून जागृती !धाराशिव येथील व्यावसायिक श्री. गणेश कदम यांनी प्रत्यक्ष हलाल उत्पादने लोकांना दाखवली आणि ‘ही उत्पादने खरेदी करू नका’, असे आवाहन केले. |
लातूर
१. लातूर येथील अधिवक्ता पुरुषोत्तम नावंदर, अधिवक्ता ईश्वर नावंदर आणि अधिवक्ता पवन नावंदर यांची भेट झाली. या वेळी अधिवक्ता पुरुषोत्तम नावंदर यांनी सांगितले, ‘‘माझ्या बारमध्ये जेवढे अधिवक्ता आहेत, त्यांची स्वाक्षरी घेऊन गृहमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात पत्र पाठवतो. या वेळी अधिवक्ता ईश्वर नावंदर म्हणाले, ‘‘तुम्हाला भेटून मला पुष्कळ आनंद झाला. आजपासून मी तुमच्यासमवेत कार्य करीन.’’
२. भामरी (जिल्हा लातूर) या गावात अधिवक्ता सचिन रणखांब यांच्या निवासस्थानी व्यापारी आणि उद्योजक यांची बैठक घेण्यात आली. विषय ऐकल्यानंतर यांत्रिक अभियंता श्री. मकरंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘आमच्या गावात याविषयी प्रबोधन होण्यासाठी आणखी बैठकांचे आयोजन करतो. तुम्ही तेथे प्रबोधन करा.’’
३. लातूर येथील सुखसागर उपाहारगृहाचे मालक श्री. अजय धुमाळ यांच्या उपाहारगृहाच्या ठिकाणी बैठक पार पडली. ‘हलाल प्रमाणपत्रा’चा विषय ऐकल्यानंतर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थितांनी त्यांचा ‘व्हॉट्सअप’वर गट सिद्ध केला आणि ‘आपण नियमित संपर्कात राहून यासंदर्भात कृती करूया’, असे निश्चित केले.
४. लातूर येथील हॉटेल व्यावसायिक श्री. आनंद आगरवाल यांनी ‘हलाल अर्थव्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.
सोलापूर
१. सोलापूर येथील अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी तत्परतेने इतरांचे प्रबोधन केले. खरेदीला गेल्यानंतर एका बिस्किटाच्या पुड्यावर ‘हलाल’चे चिन्ह असल्याचे लक्षात येताच त्यांनी तो पुडा खरेदी करण्याचे टाळले.
२. सोलापूर येथील श्री. शिवराज पडशेट्टी यांनी उद्योजक श्री. नरेंद्र दारा यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी श्री. नरेंद्र दारा यांनी सनातनचे २८ ग्रंथ खरेदी केले. श्री. दारा हे प्रतिदिन अग्निहोत्र करतात. बैठकीच्या वेळी अग्निहोत्राची वेळ झाल्याने त्यांनी कार्यालयातच श्री. मनोज खाडये आणि श्री. राजन बुणगे यांच्या हस्ते अग्निहोत्रात आहुती दिली.
३. सोलापूर येथील श्री. साई क्षीरसागर यांनी श्री. रवि वाले यांच्या कापड दुकानात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी श्री. रवि वाले यांनी सनातनचे ९ ग्रंथ खरेदी केले. त्यांनी सांगितले, ‘‘दिवाळीनिमित्त आम्ही ग्राहकांना भेट देत असतो. यापुढे मी सनातनचे ग्रंथ ग्राहकांना भेट देईन.’’ या बैठकीमध्ये किराणा मालाच्या व्यापार्यांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’चा विषय सविस्तर सांगण्याचे आयोजन करण्यात आले.
४. बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे झालेल्या व्यापारी आणि उद्योजक यांच्या बैठकीनंतर विषय ऐकून प्रभावित होऊन श्री. लक्ष्मण रामगुडे यांनी या कार्याला साहाय्य म्हणून निधीचा धनादेश दिला. त्यांनी ‘आम्ही हिंदु जनजागृती समितीला तिच्या उपक्रमांमध्ये सहकार्य करू आणि इतरांनाही याविषयी सांगू’, असे आश्वासन दिले.
५. सोलापूर येथील शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले, ‘‘मी माझ्या संपर्कातील नगरसेवकांना ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेली उत्पादने खरेदी न करण्यास आणि त्यांच्यावर बहिष्कार घालण्यास सांगतो.’’
६. सोलापूर येथील अधिवक्ता संतोष न्हावकर यांनी सांगितले, ‘‘मी अधिवक्त्यांच्या बारमधून स्वाक्षरी घेऊन गृहमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला देशविघातक हलाल अर्थव्यवस्था रोखण्यासाठी पत्र पाठवणार आहे.’’
७. पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे झालेल्या बैठकीनंतर सर्व व्यापार्यांनी यापुढे ‘हलाल’चे चिन्ह असलेले कोणतेही उत्पादन घेणार नाही आणि त्यांची विक्री करणार नाही’, असे आश्वासन दिले. या वेळी त्यांनी मॉलमध्ये जाऊन ‘आम्ही ‘हलाल’ लोगो असलेले उत्पादन खरेदी करणार नाही’, असा संदेश देणार आहोत’, असे सांगितले, तसेच ‘उत्पादनांवरील ‘टोल फ्री’ क्रमांक पाहून त्या आस्थापनांना दूरभाष करून त्यांचाही निषेध व्यक्त करणार’, असे सांगितले.
बीड
१. परळी (जिल्हा बीड) येथे झालेल्या बैठकीनंतर विषय ऐकून प्रभावित होऊन १ मासातून एकदा एकत्र येऊन कृतीची सूत्रे ठरवण्यासाठी एकत्र येण्याचे व्यापार्यांचे निश्चित झाले. या वेळी व्यापार्यांनी ४ ग्रंथ खरेदी केले.
२. अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील अधिवक्ता श्रीकांत दहीफळे यांनी विषय समजून घेऊन ‘मी हलाल जिहाद रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन’, असे सांगितले. या वेळी व्यापार्यांनी सनातनचे ७ ग्रंथ खरेदी केले.
३. बीडमधील अधिवक्ता जयंत राख आणि अधिवक्ता रवींद्र देशमुख यांची श्री. मनोज खाडये यांनी भेट घेतली. या वेळी अधिवक्ता राख यांनी ‘बीड येथील बारमधून २५० अधिवक्त्यांची स्वाक्षरी घेऊन गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कार्यालयाला हे निवेदन पाठवतो, तसेच व्यापार्यांच्या वतीनेही निवेदन पाठवण्याचे नियोजन करतो’, असे आश्वासन दिले.
व्यापारी संघाच्या अध्यक्षांनी ‘हलाल’चा शिक्का असलेले उत्पादन पुरवठाकर्त्याला परत केले !गेवराई (जिल्हा बीड) येथे झालेल्या बैठकीला हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी संघटना, जैन समाजाचे कार्यकर्ते आणि उद्योजक, असे ३३ जण उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना एका उत्पादनावर ‘हलाल’चा शिक्का असलेले दाखवले. त्या वेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र रुकर यांच्याकडे तशाच प्रकारचे उत्पादन विक्रीसाठी होते. श्री. रुकर यांनी तातडीने ते उत्पादन एका पोत्यामध्ये भरले आणि ते ‘हलाल’चा शिक्का असल्याने पुरवठाकर्त्याला (डिलरला) परत केले. विशेष१. गेवराई येथे श्री. सुरेंद्र रुकर यांनी त्यांचे दुकान इतरांवर सोपवले आणि ते स्वतः बैठकीला उपस्थित राहिले. त्यांची जेवणाची वेळ सायंकाळी ७ वाजता असते, तरी त्यांनी आणलेला डबा तसाच ठेवून बैठकीस प्राधान्य दिले. २. श्री. केशव पंडित स्वतःचे दुकान बंद करून बैठकीमध्ये सहभागी झाले. बैठक झाल्यानंतर त्याच रात्री गेवराईतील सर्व व्यापार्यांच्या ‘व्हॉट्सअप’च्या गटात ‘हलाल’चे चिन्ह असलेले उत्पादन कोणकोणत्या व्यापार्यांकडे आहे, ते शोधून गटांमध्ये ठेवावे’, असे आवाहन त्यांनी केले. त्याप्रमाणे सर्व व्यापार्यांनी स्वत:कडे कोणती उत्पादने आहेत, याचे निरीक्षण करून ती नावे गटात पाठवली आणि ती सर्व उत्पादने पुरवठाकर्त्याला परत पाठवण्याचे निश्चित केले. |