वेंगुर्ले येथील रविराज चिपकर यांची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाळूच्या शिल्पातून श्रद्धांजली
वेंगुर्ले (जिल्हा सिंधुदुर्ग) – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर समाजातील सर्व स्तरांवरील मान्यवरांसह सर्वसामान्य व्यक्तींनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सोन्सुरे येथील सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सागरतीर्थ समुद्रकिनारी वाळूच्या शिल्पातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.