सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घातली नाही, तर आत्मदहन करणार ! – अयोध्येतील तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांची चेतावणी
संतांना अशी मागणी आणि त्यासाठी अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकारने स्वतःहून हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घातली पाहिजे ! – संपादक
अयोध्या (उत्तरप्रदेश) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केल्यामुळे या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच खुर्शिद यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा, अशा मागण्या येथील तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या. या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण आणि आत्मदहन करण्याची चेतावणीही त्यांनी दिली. काही दविसांपूर्वी संत परमहंस दास यांनी खुर्शिद यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रारही प्रविष्ट केली आहे.
अयोध्या के संत परमहंस दास ने चेतावनी दी कि सलमान खुर्शीद पर राष्ट्रद्रोह का केस नहीं किया तो वह आत्मदाह करेंगे.https://t.co/9r8HYMsnaW
— News18 Uttar Pradesh (@News18UP) November 16, 2021