ओडिशा येथे धाड घालण्यास गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक नागरिकांकडून मारहाण

लहान मुलांच्या अश्‍लील चित्रपटांचे प्रकरण

यावरून समाजात पोलिसांचा किती वचक आहे, हे लक्षात येते ! अशा नागरिकांवर सरकारने कारवाई केली पाहिजे ! – संपादक

भुवनेश्‍वर (ओडिशा) – लहान मुलांच्या अश्‍लील चित्रपटांच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) देशातील १४ राज्यांतील ७७ ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी ओडिशातील ढेंकनल येथे जमावाकडून सीबीआयच्या पथकावर आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली.


ढेंकानाल येथील सुरेंद्र नायक याच्या घरावर धाड टाकून त्याची चौकशी चालू असतांना संतप्त नागरिकांनी या पथकातील अधिकार्‍यांवर आक्रमण केले. त्यांनी हातात काठ्या घेऊन अधिकार्‍यांना घेरले आणि त्यांना नायक याच्या घरातून बाहेर काढून मारहाण केली. या वेळी स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत अधिकार्‍यांची सुटका केली.